पुणे :६६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्याच्या वाघोलीतील लोणीकंद फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कुलच्या मैदानावर आयोजित कऱण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जातील. या स्पर्धेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपांत्य फेरीच्या लढतीत पंचाच्या निर्णयावर काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ज्यानंतर हा वाद पुर्ण महाराष्ट्रभर पेटला होता. ही लढत गंगावेश तालमीतील सिंकदर शेख आणि सोलापुरच्या महेंद्र गायकवाड यांच्या खेळवण्यात आली होती.









