अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर शिंदे गट नाराज होता. या नाराजीचे कारण होते अर्थखातं. या अर्थखात्यावरुन चांगलच राजकारण घडलं होतं. अखेर शिंदे गटाची नाराजी दूर करत अर्थखातं अजित पवार यांचेकडे देण्यात आले. आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे अर्थखातं चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्यापूर्वी अर्थखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. दरम्यान अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हे अर्थखातं आपल्याकडे राहील की नाही, असे अजित पवार म्हणाले. माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळे आपल्याला झुकतं माप, असे देखील अजित पवार म्हणाले. बारामतीत ते एका कार्यक्रमात बोलत होते.
“अजित पवार आज मंत्रिडळात आहेत. त्यांच्या हातात राज्य सरकारचे अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं परंतू हे पुढे टिकेल नाही टिकेल हे माहिती नाही. पुढचं कोणी सांगितलं”, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार नाराज आहेत का?, अशी देखील चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोनदा बंद दाराआड चर्चा केली. विशेष म्हणजे या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग नव्हता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असूनही उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या गावी बारामतीत होते. अजित पवार यांनी शहा यांच्या उपस्थितीपासून दूर ठेवणे हे आगामी राजकीय घडामोडींचे संकेत असल्याची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे.









