आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे उघडले खाते.! ; नेमबाजी अन् रोईंगमध्ये जिंकले रौप्यपदक.

34

हांगझाऊ : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे. नेमबाजीत भारताने दिवसातील पहिले पदक जिंकले. दुसरे पदक पुरुष दुहेरी लाइटवेट स्कलमध्ये जिंकले. या दोन पदकांसह भारताने पदकतालिकेतही आपले नाव कोरले आहे. ही दोन्ही पदके रौप्य आहेत.

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारताने रौप्यपदक जिंकले. दुसरे रौप्य पदक रोईंगमध्ये जिंकले, जेथे भारतीय पुरुषांनी बाजी मारली.

भारताने नेमबाजीत जिंकले पहिले पदक –

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीने भारताचे पदकतालिकेत खाते उघडले. येथे भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिघींनी मिळून 1886 गुण मिळवले, ज्यामध्ये रमिताने 631.9 गुण मिळवले. मेहुलीने 630.8 तर आशीने 623.3 गुण मिळवले.

डबल स्कल्समध्ये भारताने जिंकले दुसरे पदक – 

नेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल स्कल्समध्ये आनंद साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी 6:28:18 अशा वेळेसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनकडे गेले.