‘बाप्पा., लवकर परतुनी या..!” ; मळेवाड येथे पाच दिवसांच्या गणरायांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन.!

94

सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड येथे पाच दिवसांच्या गणरायांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. टाळ्यांचा गजर, तबल्याची साद आणि सुमधुर आरतींचा जागर यामुळे विसर्जन स्थळावर उत्साहवर्धक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!’, “बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला.!” असा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी भावपूर्ण वातावरणात आज निरोप दिला.