इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी वनडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघामध्ये हसन अली याचे कमबॅक झालेय. जवळपास दीड वर्षांनतर हसन अलीने पाकिस्तान संघात कमबॅक केले आहे.
दुखापतीमुळे नसीम शाह विश्वचषक स्पर्धेला मुकणार आहे. आशिया चषक स्पर्धेत नसीम शाह याला दुखापत झाली. शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि सलमान आगा पाकिस्तान संघाचा भाग आहेत. शादाब खान याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आले. पाकिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत नसीम शाहचा समावेश आहे. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. शुक्रवारी पाकिस्तानने संघाची घोषणा केली. नसीम शाह याच्या अनुपस्थितीत संघाने हसन अली याच्यावर विश्वास दाखवला आहे. हसन अलीने जवळपास दीड वर्षाने संघात कमबॅक केलेय. जानेवारी २०२२ मध्ये हसन अली याने अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तान संघाबाहेरच आहे. हसन अली याने 60 वनडे सामन्यात 91 विकेट घेतल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हटके अंदाजात विश्वचषकात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली. पीसीबीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर व्हिडीओ पोस्ट करत संघाची घोषणा केली.
वर्ल्डकप 2023 साठी पाकिस्तानचा संघ –
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव : मोहम्मद हरिस, जमान खान, अबरार अहमद.








