‘माझ्या वडिलांचं निधन झालं.!’ ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाच्या ट्विटमुळे खळबळ.

44
  1. वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे (ट्विटर) X खाते हॅक करण्यात आले आहे. त्यांच्या हॅक करण्यात आलेल्या खात्यावरून सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र, हे खाते हॅक झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाल्याचे त्यांच्या X खात्यावरून पोस्ट करण्यात आले आहे, जे खोटे आहे.

या खात्यावर अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विरोधात अपशब्द लिहिले जात आहेत. इलॉन मस्कबद्दलही एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. हॅकरने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या X खात्यावरून पोस्ट केले आहे की, ‘माझे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाले आहे. ते या जगात नाहीत हे सांगताना मला खूप वाईट वाटत आहे. मी 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेत आहे.’

उत्तर कोरियाला उध्दवस्त केले जाईल, अशीही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या X खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. या सर्व पोस्ट पाहता हे अकाउंट हॅक झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या अकाऊंटवरून हॅकर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सतत शिवीगाळ करत आहे. इतकेच नव्हे तर नाही तर (ट्विटर) एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्याबाबतही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. हॅकरने लोगन पॉलबाबतही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. या सगळ्यामागे कोणाचा हात आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.