बांदा : आज दि. 17/09/23 रोजी सीमा तपासणी नाका इन्सुलि येथे चालक दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व रस्त्यावर वाहन चालवताना रस्ता सुरक्षा नियम उल्लंघन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच वाहन चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना चालक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक मोटार निरीक्षक अमित नायकवडी, सिंधुदुर्ग लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी घोगळे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कमिटीचे सचिव मनोज वालावलकर, अनिल मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अनिल पावस्कर, वरिष्ठ लिपिक गणेश कोळी, शिपाई गणेश जाधव तसेच वाहनचालक व ग्रामस्थ इन्सुली, बांदा उपस्थित होते.






