वॉर्नरने मोडला सचिनचा शतकांचा ‘हा’ विक्रम..!

55

ब्लम फौंटेन : डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारा खेळाडू झालाय. वॉर्नर याने या शतकी खेळीसह सचिन तेंडुलकरच्या शतकांचा विक्रम मोडला आहे. डेविड वॉर्नर याने शनिवारी 46 वे शतक ठोकले. वॉर्नर याने आतापर्यंत वनडेमध्ये 20 कसोटीमध्ये 25 आणि टी 20 मध्ये एक शतक ठोकले.

 विश्वचषकाआधी डेविड वॉर्नर फॉर्मात परतलाय, ऑस्ट्रेलिया संघासाठी ही दिलासादायक बाब आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने दक्षिण आफ्रिकाविरोधात शतकी खेळी केली.वॉर्नर याने 93 चेंडूत 106 धावांची दमदार खेळी केली.