सिधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आरक्षण कोटा आणि जलद गाड्यांचे थांबे कधी मिळणार ? जिल्हा मुख्यालयानजीक असलेल्या या रेल्वे स्थानकाची अशा पद्धतीने दुरावस्था का ? असा प्रश्न सिंधुदुर्ग प्रवासी संघटना रिक्षा व्यावसायीक, ग्रामस्थ यांच्या वतीने केला जात असून याबाबत रेल्वे प्रशासनाने आणि शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन उभारावे लागेल असा इशारा ही दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालयानजीक असलेले सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन गेले अनेक वर्षे अडगळीत पडल्याची स्थिती आहे कोकण कन्या, मांडवी, तुतारी या तीनच गाड्या या स्थानकावर थांबा दिला जात असून नेत्रावती, जनशताब्दी सारख्या काही गाड्यांना थांबा मिळावा अशी सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. दरम्यानच्या काळात सीएसटी मडगाव ही उन्हाळी दिवाळी हंगामासाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरू केली आहे, वास्तविक सीएसटी मडगाव दिवा पॅसेंजर प्रमाणे नियमित रेल्वे सुरू करावी किंवा दादर मडगाव नव्याने रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी सातत्याने मागणी होत आहे. परंतु या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहे असे प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे केंद्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यासह मंडळी कार्यरत असून जिल्हा मुख्यालयातील नजीकच्या या रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्षच होत आहे.
या रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता खड्डा खड्ड्यांनी भरलेला आहे. अशा त्या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी सह प्रशासकीय अधिकारी सातत्याने ये जा करत असतात. परंतु या रस्त्याच्या दुरावस्तेकडे लक्ष दिला जात नाही. पावसाळ्यात पडलेल्या या खड्ड्यांची दुरावस्था लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्या वतीने खड्डे बुजवा कार्यक्रम आखण्यात आला. शासनाकडे निधी नसल्यामुळे दानशूर व्यक्तींकडून खडी आणि साहित्य घेऊन खड्डे बुजविले. त्या रस्त्यावरून सातत्याने खडी वाहतूकही होत असल्यामुळे दुरावस्तेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर काँक्रीट रस्ता व्हावा अशी मागणी आहे. परंतु या रस्त्यासह सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षात असून जलद गाड्यांना थांबा नाही.
नागपूर मडगांव नागपूर रेल्वे ही थांबा रद्द केला आहे. कोरोना काळात बंद झालेला कोकण कन्या ,मांडवी, तुतारी या तीनही गाड्यांचा कोटाही बंद केला आहे. सिंधुदुर्ग स्थानक हे नावापुरते जिल्ह्याचे स्थानक म्हणून ओळखले जाते, खासदार विनायक राऊत हे या भागातील आहे गेल्या काही वर्षापासून सातत्याने या रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा नेत्रावती, जनशताब्दी सारख्या गाड्या थांबाव्यात नव्याने दादर मडगाव गाडी सुरू करून सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा मिळावा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या, काही दिवसापूर्वी पालकमंत्री रवींद चव्हाण याचेही लक्ष वेधले, परंतु सध्या नव्याने सुरू करण्यात आलेली हंगामी सीएसटी मडगाव या गाडीलाही सिंधुदुर्ग थांबा नाही, कुडाळ, कणकवली हेच महत्त्वाचे जंक्शन स्टेशन दाखवून जिल्ह्याचे मुख्यालय नजीक असलेले सिंधुदुर्ग रटेशन आज अडगळीत पडल्यासारखे आहे.
या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार असा सवाल येथील ग्रामस्थ ,रिक्षाव्यवसायिक आणि रेल्वे प्रवासी संघटना यांच्यावतीने करण्यात येत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालवणकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग हे जवळचे स्टेशन असून याकडे लक्ष द्यावे न पेक्षा आम्हाला जन आंदोलन सारखा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही प्रवासी संघटना, रिक्षा व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येत आहे.




