नवी दिल्ली : विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावरील कंपनांची नोंद केली आहे. विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे पाच सेकंदांची कंपने नोंदवली. चंद्रावरील या कथित भूकंपाबाबत इस्रोने म्हटलं आहे की, चंद्रावर ही नैसर्गिक घटना नोंदवण्यात आली आहे. प्रज्ञान रोव्हर आणि इतर पेलोड्सनेही यासंबंधीचा डेटा इस्रोला पाठवला आहे. आणि आता या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे.
लॅडरमध्ये बसवलेल्या ILSA (इंस्ट्रूमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी) ने 26 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 5 सेकंद हे कंपन रेकॉर्ड केले. मात्र, इस्रो चंद्राच्या या कंपनाच्या कारणांवर संशोधन करत आहे. स्वदेशी ILSA इतकं संवेदनशील आहे की त्याने 25 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान रोव्हरच्या हालचालीमुळे होणारी कंपनेही अचूकपणे रेकॉर्ड केली आहेत. इस्रोने सांगितलं की ILSA पेलोडने एक घटना रेकॉर्ड केली जी नैसर्गिक असल्याचे दिसून आले. विक्रम लँडरने शोधलेली ही संपूर्ण घटना चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपाची शक्यता दर्शविते. मात्र अद्याप याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याने आताच काहीही बोलणं फार लवकर ठरेल. इस्रोने सांगितलं की, याशिवाय, 26 ऑगस्ट 2023 रोजी नोंदवलेल्या नैसर्गिक घटनेचा स्रोत तपासला जात आहे.
जाहिरातचांद्रयान 3 चांगलं काम करत आहे. चांद्रयान 3 चंद्रावर उतरलेला आज 10 वा दिवस आहे. या काळात चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावरून अनेक महत्त्वाची माहिती पाठवली आहे. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाबद्दल पाठवलेली माहिती. चंद्रावर सॉफ्ट लैंडिंग करणारा भारत हा चौथा देश आहे. विशेष म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं असून असं करणारा भारत हा पहिला देश आहे. जाहिरातयाशिवाय आतापर्यंत चंद्रावर रोव्हर प्रज्ञानची हालचाल अतिशय सुरळीत आहे. आपल्या मार्गात येणारे अडथळेही त्यानी ओळखले आणि वेळीच मार्ग बदलला. प्रज्ञानने 27 ऑगस्टला हा पराक्रम केला. म्हणजे प्रज्ञानही चांगले काम करत आहे आणि सौरऊर्जेवर चालत आहे. सूर्याची किरणे दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचेपर्यंत हा 6 चाक रोव्हर चंद्रावर काम करेल अशी अपेक्षा आहे





