२७ हजार दारूच्या बाटल्यांवर फिरवला बुलडोझर…!

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत २५५ गुन्ह्यात तब्बल २७ हजार दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्व बाटल्या दारूसह नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार शिरपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्यांमधील दारू फमोठा खड्डा खोदून त्यामध्ये ओतून दिली. यानंतर या सगळ्या बाटल्यांवर बुलडोजर फिरवून नष्ट करण्यात आल्या.