कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात प्रशालेचा नववीत शिकत असलेला विद्यार्थी ध्रुव तेंडुलकर याने प्रथम क्रमांक मिळवून बुद्धीबळ स्पर्धेत उच्चांक यश संपादन केले. त्याची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ध्रुवच्या या यशात त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. वणवे सर व श्री. पेडणेकर सर यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. प्रशालेच्या यशात क्रीडा विभाग यशस्वी झेप घेत आहे. असेच उज्ज्वल धवल यश मिळवत रहावे यासाठी संस्थाचालक, सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.





