सावंतवाडी: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस शनिवार १९ ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी साडेदहा वाजता संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.
दरम्यान, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहीत यांच्या माध्यमातून संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १९ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रामेश्वर प्लाझा येथील ‘टायटन ऑप्टीकल हब ‘ येथे होणार आहे.
यावेळी तपासणी करणार्या रुग्णांना कमीत कमी दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बंटी पुरोहीत यांनी केले आहे.





