पुंडलिक दळवी यांचे सर्वपक्षीय पदाधिकांकडून उत्साहात अभिष्टचिंतन …!

39

सावंतवाडी : राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस आज सर्वपक्षीय पदाधिकांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. आपला वाढदिवस करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आपण ऋणी असून हा वाढदिवस माझ्या जीवनातील मोलाचा क्षण आहे. तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम कधी न विसरता येणारे आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया पुंडलिक दळवी यांनी यावेळी दिली.

त्यांच्या निवासस्थानी हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे समीर वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख,
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, भास्कर परब, बाळ कनयाळकर, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, भाजपचे अजय गोंदावळे, हिदायतुल्ला खान, प्रा. सचिन पाटकर, सावली पाटकर, राकेश नेगी, बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, याकुब शेख, नियाज शेख, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, पुजा दळवी, श्रीया दळवी, भुवन दळवी, विनायक परब, बाळ सावंत, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, निलेश मेस्त्री, किशोर सावंत, योगेश चांदेलकर, संदीप गवस, सुदेश तुळसकर, वैभव परब, सायली दुभाषी, प्रसाद दळवी, अमोल दळवी, प्रिया परब आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक सोशल मीडिया सेलचे प्रा. सचिन पाटकर यांनी तर सूत्रसंचालन हिदायतुल्ला खान यांनी केले.