सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा उद्या शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी होणारा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शुक्रवारी सकाळी आठ वाजता नगरपालिका सफाई कामगारांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. तर सकाळी दहा वाजता शिरोडा नाका येथील दिव्यांग मुलांसोबत केक कापून व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी १२ वाजता समर्थ कृपा हॉल येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारणी, सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले.यावेळी तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, तालुका सरचिटणीस राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, उद्योग व्यापार सेलचे तालुका उपाध्यक्ष याकूब शेख आदी उपस्थित होते





