‘साहस’च्या अपंग पुनर्वसन कार्याला मिळणार गती ; जिंदाल पॉली फिल्म नवी दिल्ली यांच्याकडून ३५ लाखांची मदत।

49

सावंतवाडी : ‘साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन, कोल्हापूर’ (साहस) या संस्थेला उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने जिंदाल पॉली फिल्म ली. नवी दिल्ली यांच्याकडून अपंग पुनर्वसन केंद्रासाठी जमीन खरेदी करणेकरिता रुपये. ३५,००,०००/- (रुपये पस्तीस लाख मात्र) CSR निधी देणेत आला. लवकरच सदरची जमिन ‘साहस’च्या नावे करून सर्व सोयीनीयुक्त इमारतीचे भूमिपूजन करण्यचा मानस आहे. वेळोवेळी चंद्रकांतदादा पाटील यांचे मिळत असलेल्या सहकार्याने अपंग पुनर्वसन कार्याला गती प्राप्त झाली आहे.

जिंदाल पॉली फिल्म ली. चे सुदीप चौदरी, प्लान्निंग व कोऑरडीनेशन प्रमुख यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी साहसच्या अध्यक्षा डॉ. नसीमा हुरजूक, विश्वस्त श्री साताराम पाटील, साहसच्या जेष्ट सामाजिक कार्यकर्त्या मधुताई पाटील, अनाम प्रेम मुंबई चे श्री सतीश नगरे, श्री राम कापसे हे उपस्थितीत होते.

‘साहस’ला विशेष करून अपघातात असंख्य तरुण मज्जरज्जुला दुखापत झाल्यामुळे आयुष्यभर चाकाच्या खुर्चीला खिळावे लागते अश्या साठी शारीरिक पुनर्वसन केंद्र व औद्यागिक प्रशिक्षण उभे करण्यासाठी 2 एकर जमीनीची निकडीची गरज होती. लवकरच सदरची जमिन साहसच्या नावे करून सर्व सोयीनी युक्त इमारतीचे भूमिपूजन करण्यचा मानस आहे. वेळोवेळी मा. ना. श्री. चंद्रकांतदादाच्या मिळत असलेल्या सहकार्याने ‘साहस’च्या अपंग पुनर्वसन कार्याला गती प्राप्त झाली आहे.