कुडाळ : दिवाणी न्यायालय कुडाळ व कुडाळ तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुग ओरोस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दिवाणी न्यायालय, कुडाळ येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही लोक अदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच विज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था तसेच ग्रामपंचायती यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त वादपूर्व प्रकरणे दाखल करुन जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्यात यावीत.
तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांस न्यायालयात प्रलंबित प्रकरणामध्यें लोकअदालतपूर्व आपल्या प्रकारणांची बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्याच्या करीता दिनांक १ फेब्रुवारी २०२३ पासून कार्यालयीन दिवशी दुपारी ०२.०० ते ०२.३० वाजता वेळ देण्यात येणार आहे. त्याकरीता संबंधीतांनी दिवाणी न्यायालय कुडाळ येथे संपर्क साधावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश जे. जे. बाचुलकर व सहदिवाणी न्यायाधीश श्री. पी. आर. ढोरे यांनी केले आहे.




