मिलाग्रीस प्रशालेत क्रांतिदिन उत्साहात साजरा..!

55

सावंतवाडी : आज दिनांक ९ अॉगस्ट रोजी क्रांतीवीरांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचा स्मृतींना उजाळा देण्यासाठी मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये क्रांतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक विवेकानंद जोशी यांनी केले. इयत्ता १० वी (अ) मधील विद्यार्थिनी कु. श्रुती गावडे हिने आपल्या अप्रतिम मनोगतात क्रांतिदिनाविषयी सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.