नवी दिल्लीः दिल्ली एनसीआरला पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान शहराला ५.५ रिश्टर स्केल भूकंपाचे हादरे जाणवले. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं प्राथमिक माहितीनुसार सांगितलं गेलं होतं. दिल्लीत भूकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. सध्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
अफगाणिस्तानच्या हिंदूकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ५.८ रिश्टर स्केल हा मध्यम स्वरुपाचा भूकंप मानला जातो. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या तिन्ही देशांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. दिल्लीला ५.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले.दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे हादरे बसले असले तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहती नाही. शिवाय मालमत्तेचंही नुकसान झाल्याची माहिती नाही. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.





