मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. सध्या कंगना आणि करण जोहरमध्ये जोरदार वाद सुरु झाला आहे. त्याचे कारण करणचा ‘रॉकी और रा णी की प्रेम कहानी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र कंगनाला तो काही आवडलेला नाही.
कंगनानं करणवर तोफ डागली आहे. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे तो कलाकारांना भरपूर पैसे देऊन काहीही करायला सांगतो आणि प्रेक्षक ते पाहतात. अशा शब्दांत कंगनानं तिची नाराजी व्यक्त केली होती. अशातच कंगनाच्या बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तिला एक सुपरस्टार प्रपोज करणार आहे. त्यानं आता कंगनाला प्रपोझ करण्याची वेळ आली आहे. असे त्या सुपरस्टारनं म्हटले आहे.
त्याचं काय आहे की, सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर प्रकाश कुमार उर्फ पुनीत सुपरस्टार आता काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी २ मध्ये दिसला होता. आता त्याचे नाव आणखी एका रियॅलिटी शो सोबत जोडले जात आहे. पुनीतनं लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होण्याबाबत बातचीत केली आहे. काही दिवसांपूर्वी पुनीतचं इंस्टा अकाउंट ब्लॉक झाले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती.





