अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार नवीन मोबाईल! ; महिला व बाल विकास मंत्र्यांची माहिती

171

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरू आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन दिले जातील, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामासाठी देण्यात आलेले मोबाइल फोन सदोष व कालबाह्य झाले आहेत. त्यांना चार महिन्यांत अद्ययावत मोबाइल उपलब्ध करून देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यावर सरकारनं काय कार्यवाही केली, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तर दिलं. त्यानुसार, मोबाइल उपलब्ध करून देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं अंगणवाडी सेविकांसाठी मराठीसह इतर स्थानिक भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या जीईएम पोर्टलवर मोबाईल फोन खरेदी संदर्भात निविदा प्रकाशित करण्यात आली आहे, त्या पुढील प्रक्रिया सरकारच्या खरेदी धोरणानुसार पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.