मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. पण लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत धावणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीत वंदे भारचे स्लीपर कोच तयार केले जात आहेत. तर, दुसरीकडे मुंबई ते दिल्ली दरम्यान मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या आर्थिक वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई-दिल्ली या मार्गावर धावणार आहे. मुंबई ते दिल्ली रेल्वेमार्गाने जाण्यासाठी १६ तास लागतात. मात्र ते अंतर कमी करुन १२ तासांवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकल्पाला २०१७ ते १८ मध्ये मंजूरी मिळाली होती.
यासाठी मुंबई आणि दिल्ली दरम्यान रेल्वे रूळांची मजबूती, पुल दुरुस्त करणे, ओएचई मॉर्डनायजेशन करणे, संपूर्ण रेल्वे रुळांवर कवच प्रणाली स्थापित करणे, रुळांवरुन दोन्हीकडून काम केले जाणार आहे. रुळांवरुन रेल्वे १६० किमी ताशी वेगाने धावण्याचे उद्दिष्ट आहे.





