सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य सुरूच..!

85

सावंतवाडी : दिनांक 21 जुलै संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान सिनेमा टॉकीज जवळील एक मोठ आंब्याचे झाड मुळासकट तुटून रस्त्यावर कोसळले सुदैवाने जीवित हानी टळली यासाठी सामाजिक बांधणीच्या आपत्कालीन टीमने व नगरपरिषदे अधिकारी दीपक म्हापसेकर ,वर चढून झाड तोडणारा पालिकेचा कर्मचारी आंबेडकर , इतर कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी रस्त्यावरचे झाड काही वेळेतच तोडून रहदारीस मार्ग मोकळा करून दिला ट्राफिक मोठ्या प्रमाणे वाढलं होतं याकरिता ट्राफिक पोलीस राजाराम राणे यांनी काय दखल घेऊन रहदारी सुरळीत केली. याकरिता सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, शाम हळदणकर, दीपक सावंत ,सुजय सावंत सतीश बागवे, सुरेश सुरेश भोगटे, रवी जाधव यासाठी हातभार लावला.