सावंतवाडी : वैश्य समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा पुढे ढकलण्यात आला…
वैश्य समाज, सावंतवाडी तर्फे प्रतीवर्षाप्रमाणे ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु जिल्हाधिकारी व हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये सोमवार पर्यंत पावसाचे रेड अलर्ट जाहिर केल्यामुळे विद्यार्थी गुणगौरव समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. तरी समारंभाची तारीख नंतर कळविण्यात येईल, असे वैश्य समाज, सावंतवाडीचे अध्यक्ष रमेश चंद्रकांत बोंद्रे कळवितात.




