देवगड तालुक्याला वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले ; ठिकठिकाणी झाडे पडून रस्ते झाले बंद..!

42

देवगड : देवगड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाने चांगले झोडपून काढले असून मुणगे पोयरे गावाला वादळी वाऱ्याचा
मोठा फटका बसला आहे . या गावात सुमारे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली असून सुमारे साठ हजाराच्या नुकसान झाले आहे. गडीताम्हाणे मधली वाडी रस्त्यावर सकाळी अकरा वाजता फणसाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. वादळी वाऱ्याने पोयरे येथील रामचंद्र केसकर यांच्या मांगराच्या
छप्परावर झाड पडल्याने सुमारे पाच हजार रुपये नुकसान झाले . तर पोयरे राणेवाडी येथील भरत सदाशिव राने यांचे गोठयाचे छप्परावर झाड पडल्याने सुमारे ५ हजाराचे नुकसान झाले. मुणगे येथील जोराच्या वाऱ्यामुळे हरी दिनकर परुळेकर यांच्या चिरेबंदी पत्राशेडचे पत्रे उडून सुमारे दहा हजार सातशे रुपये नुकसान झाले. तर मुणगे स्मशानशेडवर आंब्याचे झाड पडून सुमारे ३८ हजार ६०० रुपये नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे , झाडे पडणे तर काही भागात रस्तेही ठप्प झाले आहेत. शिरगाव येथील धोकादायक स्थितीत असलेली दोन्ही वडाची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने आधीच तोडल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. पासून देवगड तालुक्यात थोडीशी पावसाने विश्रांती घेतली असल्याने जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे