सावंतवाडी : राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षक आणि विद्यार्थीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा मंत्रालयात संपन्न झाली. या सभेमध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पालवे, राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी मागासवर्गीय शिक्षकांचे 21 प्रश्न शासन दरबारी मांडले. या सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा होऊन बरेचसे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश यावेळी मंत्री केसरकर यांनी दिले.
राज्यातील बीएड, डीएड बेरोजगार तरुणांना शिक्षण सेवक म्हणून नोकरीची संधी मिळावी, मागासवर्गीयांचा भरती मधील अनुशेष दूर करावा* संघटनेच्या या प्रमुख मागणीवर मंत्री महोदयांनी येत्या महिनाभरात पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30,000 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले व त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांचे रोस्टर अद्यावत करून घेण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येतील असे सांगितले.
या सभेकरता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.
सदर सभेकरीता कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने प्रशांत मोरे ( कार्याध्यक्ष), राजेंद्र वाघमारे( विभागीय अध्यक्ष,अमरावती), किरण मानकर( राज्य उपाध्यक्ष), तुषार आत्राम( अतिरिक्त सरचिटणीस), स्वप्नील फुलमाळी( जिल्हा सरचिटणीस यवतमाळ), संतोष आत्राम( जिल्हाध्यक्ष नागपूर), सौ.वंदना भामरे(राज्य महिला प्रतिनिधी ), प्रभाकर पारवे( अतिरिक्त सरचिटणीस ) , सिद्धार्थ मस्के (जिल्हाध्यक्ष, परभणी), श्रीसेल कोरे( राज्य उपाध्यक्ष) ,सोमलिंग कोरे( जिल्हा सरचिटणीस सोलापूर) ,गौतम वर्धन ( जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर), बाजीराव प्रज्ञावंत ( विभागीय अध्यक्ष कोल्हापूर) इत्यादी राज्यातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी मानले.



