सावंतवाडी : राज्यातील आगामी तलाठी पदासाठी निघालेल्या भरतीकरीता अर्ज सादर करण्याची मुदतवाढ उद्या दिनांक १८ जुलै रात्री ११ वाजून ५५ मिनिटापर्यंत करण्यात आली आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी उद्या १८ जुलैपर्यंत अर्ज सादर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा तसेच विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २० जुलै रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटापर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकारद्वारे अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे श्री. आनंद रायते यांनी कळविले आहे.





