मिलाग्रिसच्या विद्यार्थ्यांचे ऑलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीतत यश..!

206

सावंतवाडी : सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या ऑलंपियाड परीक्षेमध्ये गणित या विषयामध्ये प्रशालेचा इयत्ता 7 वी चा विद्यार्थी कु. संस्कार जगदिश राऊळ याने विशेष प्राविण्य संपादन केले. तसेच इंग्रजी या विषयामध्ये इयत्ता 8 वी च्या कु. निधी कानविंदे व कु.अवनी भांगले या विद्यार्थीनींनी विशेष यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका मेघना राऊळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.