देवगड :- श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल या प्रशालेच्या १९९२-९३ च्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी बँकेत 50 हजार कायम ठेव स्वरूपात जमा केली आहेत.त्याच्या व्याजातून सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून रोख रक्कम देण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी उत्तम पडेलकर, रवींद्र तिर्लोटकर, प्रकाश वारीक, संतोष मोंडे , सचिन देवधर, प्रवीण सावंत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हरेश शेलार तर उपस्थितांचे आभार मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केले.