देवगड :- देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव येथील पत्रकारांच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार*देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव विभागातील पत्रकारांच्या १० वी व १२ वी मध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अजिंक्य साटम (१२वी) ऋग्वेद साटम ( इ. १० वी ) या मुलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, जिल्हा पत्रकार कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर, पत्रकार संतोष कुलकर्णी, राजेंद्र साटम, संतोष साळसकर, श्रीकृष्ण रानडे, दिनेश साटम, गणेश आचरेकर आदी पत्रकार तसेच सौ. स्नेहल साटम आदी मान्यवर उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव येथील पत्रकारांच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या...





