अजित पोळजी, मित्र परिवार आणि विद्यार्थ्यांनी केलं आयोजन..
सावंतवाडी : तळवणे येथे गुरुपौर्णिमा उत्सव पूर्ण उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी वर्गाचे वादन आणि गायन ऐकून श्रोते अत्यंत मंत्रमुग्ध झाले.सर्व विद्यार्थ्यांचे वादन गायन ऐकून प्रेक्षक वर्गाने त्यांना शाबासकीची दाद दिली.
या कार्यक्रमाची सुरवात ‘नमस्कार माझा ज्ञान मंदिरा’ प्रार्थनेने झाली. ह्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सिंधुदुर्गातील भजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध बुवा गुरुवर्य भावेश राणे आणि बाबू गोडकर यांचे सादरीकरण झाले.मधल्या वेळेत विद्यार्थ्यांनी आणि आयोजकांनी मठाधिपती राजेंद्रस्वामी भारती महाराज गुरुवर्य भावेश राणे आणि बाबू गोडकर यांचे गुरुपूजन केले.
यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थांनी तळवणे गावात संगीत विद्यालय चालू केल्याबद्दल आणि आणि इथल्या मुलांना संगीत क्षेत्राकडे वळवल्याबद्दल संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री आणि त्यांचे विद्यार्थी आणि कुठच्याही भजन दशावतार श्रेत्रातील कार्यक्रमात पुढे राहून पूर्ण नियोजन करून कुठचाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास नेणारे अजित पोळजी यांचे सर्व लोकांनी आणि श्रोतेवर्गानी भरभरून कौतुक केले.
त्यावेळी राजेंद्रस्वामी भारती महाराज, सरपंच समीर केरकर, उपसरपंच रामचंद्र गावडे, मनसेचे माजी जिल्हाद्यक्ष सुधीर राऊळ, पखवाज, तबला वादक प्रदीप वाळके (बांदा), सीमा गिरी (तळवणे मठ), पत्रकार मदन मुरकर, संदीप नेमळेकर, प्राथमिक शिक्षक कवडे सर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज तळवणेकर यांनी केले. सुप्रसिद्ध भजनी कलाकार गजानन मेस्त्री (होडावडा), पखवाज अलंकार मनीष तांबोस्कर, पखवाज विशारद सचिन पांगम, शैलेश मेस्त्री, तबला वादक सागर सावळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अजित पोळजी, महेश तळवणेकर ग्रामस्थ तळवणे परिवार, व्यवस्था गुरुकृपा मठवाडी सदस्य यांनी केले.





