आरोंदा रस्त्यावरील ‘तो’ खड्डा ठरणार जीवघेणा | वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर..!

75

सावंतवाडी : मळेवाड-आरोंदा रस्त्यावर खरी येथे उतारावर पाण्याच्या पाईप लाईनसाठी रस्ता खोदून पाईप लाईन घातली होती.
त्यानंतर संबंधित ठेकेदाराने या खोदलेल्या रस्त्यावर काँक्रिट घालून रस्ता सुरळीत केला होता. मात्र यावर घातलेलं काँक्रिट आता निघून त्या ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले आहेत.
हे खड्डे उतारावर असल्याने तसेच पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्याने वाहन धारकांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
तरी संबंधित ठेकेदाराने या बाबत लवकरात लवकर पडलेले खड्डे बुजवावेत,
अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.