महाराष्ट्र माझा न्युज चॅनल च्या माध्यमातून वृत्त प्रसारित करण्यात आले होते
कणकवली | मयुर ठाकूर : अखेर महाराष्ट्र माझा न्युज च्या लक्षवेधी बातम्यांनंतर चालढकलपणा करणाऱ्या प्राधिकरण आणि ठेकेदार यांना दखल घेऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेनुसार ओव्हरब्रिज वरून कोसळणाऱ्या धबधब्यांची दुरुस्ती करणे भाग पडले. आज सकाळपासून कणकवली नरडवे नाका ते छत्रपती शिवाजी चौक पर्यंत एका बाजूने कोसळणारे धबधबे दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
फ्लाय ओव्हर ब्रिज वरील पाणी पाईप द्वारे ब्रिजच्या पिलर जवळ सोडण्यात येत होते. मात्र अनेक भागांमध्ये या पाईप द्वारे पाणी न जाता ज्या ठिकाणी पाईप फ्लाय ओव्हरला जॉईड केलेले होते तिथूनच भेट धबधब्या सुदृश्य पाणी सर्व्हीस रस्त्यावर कोसळत होते. याबाबत अनेकदा आवाज उठवुन देखील याकडे दुर्लक्ष केले जात होते. गेली तीन वर्ष हे काम मार्गी लावण्याबाबत सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर महामार्ग प्राधिकरण कडून केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम केले जात होते.
मात्र याबाबत उपअभियंता श्री. साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी या कामाकरिता आवश्यक असणारी” स्काय लिफ्ट” मशिनरी उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले होते असे सांगितले होते. मात्र ही मशनरी उपलब्ध झाली असल्याने हे काम लवकर मार्गी लावले जाईल असे सांगण्यात आले. दरम्यान पावसाचा जोर असल्याने पाईप जॉईड करीता लावण्यात येणारे केमिकल हे पाईपला चिकटत नसल्याने पावसाने उघडीप घेतल्यानंतर हे काम वेगाने करणे सोपे जाणार असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.



