सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडीभाजप सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेतली.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे श्रीराम वाचन मंदिर येथेआयोजित केलेल्या बैठकीत सावंतवाडी भाजप सरपंच उपसरपंच संघटना पदाधिकारी व सदस्यांनी ग्रामपंचायतमध्ये विकास कामे करत असताना येणाऱ्या समस्या मांडल्या.यातील बहुतांशी हा अडचणी प्रशासन मुळेउद्भवत असल्याने भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना जिल्हा परिषदमुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात आपण योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन दिले होते.
यालाच अनुसरून आज सावंतवाडीच्या भाजप सरपंच व उपसरपंच संघटना पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,
यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन ग्रामपंचायत मध्ये विकास कामे करत असताना येणाऱ्या अडचणी मांडल्या.यामध्ये दुपार झालेली कामे बदलून देणे,वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये गावनिहाय लाभार्थी निवड करावी,जलजीवन मिशनबाबत असलेल्या समस्या,बक्षीस पत्रासाठी किमान एक महिना मुदत द्यावी,आपले सरकार केंद्राच्या एजन्सी कडून योग्य सुविधा मिळत नसल्याबाबत तक्रार,विकास कामांची वेळेत अंदाजपत्रके मिळत नसल्याबाबत तक्रार,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 15 वित्त आयोगातून विकासकामे घेण्याबाबत चर्चा,गावात एखादे विकासात्मक काम झाले तर त्याकरिताकाम पूर्ण त्वचा दाखला घेण्याची अट अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी संघटनेकडून मांडलेल्या समस्यांवर लवकरच योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घालून दिल्याबद्दल भाजप सरपंच उपसरपंच संघटनेकडून तेली यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी भाजप सरपंच उपसरपंच संघटना अध्यक्ष दिपक नाईक,सचिव हेमंत मराठे,उपाध्यक्ष हनुमंत पेडणेकर,सत्यविजय गावडे,संतोष राऊळ,जावेद खतीफ,दिनेश सारंग, लवू भिंगारे,अजित कवठणकर, अष्टविनायक धाऊसकर,समीर केरकर,संदीप नेमळेकर उपस्थित होते.





