कणकवली : आषाढी एकादशी निमित्त कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदे डगळवाडी नं. २ मधील चिमुकल्या विध्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा व विठ्ठल रखुमाईची वेशभूषा सादर करत वारकरी दिंडी काढली. चिमुकल्यानी केलेल्या वेशभूषांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक वेदिका विनोद चव्हाण, केंद्रप्रमुख विजय मसुरकर, सहकारी शिक्षिका वैशाली भानुदास मिसाळ, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, ग्रामपंचायत सदस्या संजना गावडे, शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर मेस्त्री, उपाध्यक्ष संगीता गावडे, नागेश आमडोसकर, दिनेश तोरस्कर, संदेश बागवे, स्मिता परब यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.





