ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांची 2 जुलै रोजी सभा…

37

कणकवली : ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य व ग्राहक जागृती करणा-या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांची विशेष सभा रविवार दिनांक २ जुलै रोजी अप्पासाहेब पटवर्धन सभागृह, नगर वाचनालय कणकवली येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात ग्राहक जागृती व मार्गदर्शनाचे कार्य सुरू आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांची एक जिल्हास्तरीय सभा संस्थेचे राज्य सचिव मा.अरुणजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली अप्पासाहेब पटवर्धन सभागृह, नगर वाचनालय कणकवली
येथे सकाळी ठिक १० वा. आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तसेच कार्यकर्त्यांचे प्रश्न,अडचणीवर चर्चा होऊन संस्थेची पुढील ध्येय धोरणे व कार्यक्रम याबाबत माहिती दिली जाणार आहे.
या जिल्हास्तरीय सभेला जिल्हा शाखा व तालुका शाखा कार्यकारिणीने वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव श्री.संदेश तुळसणकर तसेच कणकवली तालुका शाखा अध्यक्ष श्री.नामदेव जाधव, सचिव श्री.महानंद चव्हाण यांनी