कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात तिघांवर वैभववाडी पो. ठाण्यात गुन्हा दाखल

75

वैभववाडी | प्रतिनिधी कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा पिकअप टेंम्पो वैभववाडीत पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई मंगळवारी राञी ८ वाजता करण्यात आली. पाच बैल सुमारे १ लाख रुपये किंमतीचे तर २ लाखाचा टेंम्पो असा एकूण ३ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर गुरांची वाहातूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोळपे येथून वैभववाडी मार्गे राधानगरी येथे टेंम्पोतून कत्तल करण्यासाठी गुरे घेऊन जात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. या माहीतीवरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पो.नाईक राहुल पवार, पो.काॕ.कृष्णांत पडवळ, हरेष जायभाय, राहुल तळसकर, कुंडलिक वाणोळे यांचे पथक वैभववाडी येथील महाकाली सुपर मार्केट येथे सापळा रचून बसले होते. राञौ ८ वा. सुमारास पिक अप टेंम्पो एम एच ०७ पी २९९६ फोंड्याकडे जाणारा टेंम्पो पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता, टेंम्पोच्या हौदयात पाच बैल वाहातूकीची सुव्यवस्था न करता, कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आरोपी विठोबा बाबू चव्हाण रा. नांदगाव ता.कणकवली, लक्ष्मीकांत गोपाळ नाईक तेडोलकर रा.हुमरट ता.कणकवली ,सिराज महम्मंद नाचरे रा.कोळपे जमातवाडी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तर ताब्यात घेतलेली गुरे खांबाळे येथील एका शेतकऱ्याकडे ठेवण्यात आली आहेत. बुधवारी आरोपींना कणकवली न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.