सौंदाळे माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

28

देवगड :- श्री नवलादेवी माध्यमिक विद्यामंदिर,सौंदाळे या प्रशालेत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मुंबईस्थित उद्योजक मा. चिरल शहा यांजकडून २०० पेजीस १८० डझन वह्या व ३६० वॉटर बॉटल साहित्य प्राप्त झाले. यासाठी ‘समाजरत्न’ पुरस्कार प्राप्त रवींद्र पेडणेकर (संस्था सदस्य व राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू) यांचे अथक प्रयत्नाने सदर साहित्य मिळाले. या साहित्याचे वितरण पेडणेकर यांचे थोरले बंधू चंद्रकांत पेडणेकर व संस्थाध्यक्ष. ल. चिं. ताम्हणकर यांचे प्रमुख उपस्थितीत प्रशालेतील सर्व मुलांना करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव संजय गुरव, खजिनदार रमाकांत राणे,सदस्य संजय कांबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश रानडे, परब सर व सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कदमसर यांनी केले तर परब सर यांनी आभार व्यक्त केले.