देवगड : निपाणी महामार्गावर असलदे दर्ग्या नजीकच्या धोकादायक वळणावर ट्रक आणि महिंद्रा टियूव्ही कार ची समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातात कारमधील ५ जण जखमी झाले आहेत. त्या जखमींना कणकवली येथे खाजगी रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सर्व जखमी हडपीड गावातील आहेत. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. ए.एस. आय राजू उबाळे आणि वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला करून झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. कारचालक अमोल मेस्त्री हे हडपीडहुन बेळगावच्या दिशेने आपल्या ताब्यातील कार ( MH03 CM ७३०३ ) घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक ( MH10Z १७५३ ) ची आणि कार ची समोरासमोर वळणावर धडक बसली. यात कार चे मोठे नुकसान झाले तर ट्रक चेही नुकसान झाले आहे.





