देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे नंबर १ या जि प शाळेतील उपशिक्षक श्री विशाल वसंतराव खडसे यांची तात्पुरती व्यवस्थेने कोटकामते जि प शाळा नंबर १ मध्ये बदलीचा आदेश आपल्या कार्यालयाकडून प्राप्त झाला होता.आम्ही सर्व पालकांनी शिक्षक खडसे यांना मुणगे नंबर १ येथून कार्यमुक्त करण्यास नकार दिलेला आहे.या शाळेवर दोन शिक्षक सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सदर दोन्हीपैकी एकाही शिक्षकाला पर्यायी व्यवस्थेसाठी अन्य ठिकाणी पाठवला तर आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव २६ जून २०२३ च्या पालक सभेत झाला आहे. तरी मुलांच्या भविष्याचा विचार करून आपणास विनंती आहे की, मुणगे नंबर १ शाळेतील एकाही शिक्षकाची बदली न करता सद्यस्थितीत या दोन्ही शिक्षकांनात्या त्याच शाळेचा कार्यभार देऊन मुलांना व बालकांना सहकार्य करावे. अशा आशयाचे निवेदन मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव यांच्या नेतृत्वाखाली मुणगे येथील पालक वर्गांच्या शिष्टमंडळाने देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी व जि प शिक्षण विभाग देवगड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवगड यांना दिले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज मुणगे नंबर १ शाळेतील शिक्षकांची बदली झाल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याच्या पालकांचा...




