सावंतवाडी तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी हनुमंत पेडणेकर यांची निवड…!

69

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी हनुमंत पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सरपंच , उपसरपंच यांची रविवार २५ रोजी मळेवाड राजगड रिसॅार्ट येथे जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी तालुक्यातील ४२ चाळीस सरपंच व ११ उपसरपंच उपस्थित होते .
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना जिल्हाध्यक्ष देसाई, तालुकाध्यक्ष प्रमोद गावडे, जिल्हा संघटक सुरेश गावडे, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्व समजावून सांगितले.सरपंच म्हणून काम करताना संघटनेची नितांत गरज आहे. गेल्या पाच वर्षात संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न समस्या तालुका जिल्हा ते राज्य शासन दरबारीपर्यत पोचवण्याची व सोडवण्याचेही काम संघटनेच्या माध्यमातून केले गेले. आपले सेवा सरकार,डाटा ॲापरेटर मानधन,स्ट्रिट लाईट,वीज बिल,वन्यजीव प्राण्यांपासून होणारी शेती नुकसानी व मिळणारी तटपुंजी भरपाई अशा अनेक विषयांवर संघटीत झाल्याने सरपंच म्हणून आपल्या गावातील बाजू प्रभावीपणे मांडली .