बांदा : मुसळधार पावसामुळे बांदा पानवळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी तुळशीदास महादेव किनळेकर यांच्या राहत्या घराच्या पडविवर पिंपळ वृक्ष कोसळल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने किनळेकर कुटुंबीय यातून बचावले.
ही घटना आज सकाळी घडली. सरपंच प्रियांका नाईक, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. तलाठी नाडकर्णी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. पडवीचे पत्रे, भिंत कोसळल्याने किनळेकर यांचे नुकसान झाले. आज सकाळी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला





