कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या एका व्हॉट्सऍप फ़ोटोची कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी घेतली तात्काळ दखल.!

660

कलमठ – आचरा रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी.!

कणकवली : तालुक्यातील कलमठ – आचरा रस्त्यावर अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कलमठ कोरगांवकर दुकान, सुतारवाड़ी पारकर बिल्डिंग, लांजेवाड़ी शांतादुर्गा नगर, लांजेवाड़ी चव्हाण घर ते आइस फॅक्टरी, कलमठ कुंभारवाड़ी रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्त्यावरुन वाहत असलेल्या पावसाच्या पाण्याने वाहतूक करणे कठीण झाले होते. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पहिल्याच पावसात केलेल्या पाहणीनंतर फोटो काढून सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड़ यांना व्हाट्सप केले. काही वेळातच कार्यकारी अभियंता सर्वगोड़ यानी सरपंच संदीप मेस्त्री यांना फोन करून माहिती घेतली आणि काही वेळाने अभियंता पी. व्ही. कांबळे यांनी जेसीबी आणि सार्वजनिक बांधकाम कर्मचारी यांच्या मदतीने कलमठ मधील काम सुरु केले असल्याचा फोन सरपंच संदीप मेस्त्री यांना केला.

कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सर्वगोड़ यांचे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यानी मानले असून कलमठ ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.