शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट ॲकॅडमीची दत्तक पालक योजना | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांना मोफत जेईई, नीटचे प्रशिक्षण मिळणार

92

सिंधुदुर्गनगरी : प्रवेश परीक्षांसाठी अग्रगण्य मानले जाणारी परफेक्ट अकॅडेमीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य केले आहे. अतिशय माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना जेईई, नीट या प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देत सर्वोत्तम निकाल देण्यासाठी परफेक्ट अकॅडेमी ओळखली जाते. मोठमोठ्या शहरांकडे लाखो रुपये फी देऊन वळणारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल आता आपल्या जिल्ह्यात राहून अत्यल्प फीमध्ये प्रशिक्षण घेण्याकडे आहे.

तरी देखील तुलनात्मकदृष्ट्या ग्रामीण असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे कित्येक विद्यार्थी आहेत, ज्यांना अशा प्रवेश परीक्षांना बसण्याची इच्छा आहे, मात्र ही अत्यल्प फी देखील त्यांना भरणे परवडत नाही, म्हणूनच परफेक्ट अकॅडेमी ओरोस अशा विद्यार्थ्यांसाठी ‘परफेक्ट अकॅडेमी स्कॉलरशिप टेस्ट’ ही शिष्यवृत्ती परीक्षा घेणार आहे. या परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता बारावीमध्ये असलेल्या आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बसता येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून १५ विद्यार्थी जेईई प्रशिक्षणासाठी आणि १५ विद्यार्थी हे नीट प्रशिक्षणासाठी निवडले जातील. या विद्यार्थ्यांना परफेक्ट अकॅडेमीच्या दत्तक पालक योजनेचे फायदे मिळणार असून अकॅडेमीच्या वतीने दर शनिवारी व रविवारी मोफत प्रशिक्षण दिले जाईल, तसेच बारावीची परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांचा क्रॅश कोर्स देखील घेतला जाईल.
सदर स्कॉलरशिप परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील मुख्य जुनिअर कॉलेजेसमध्ये घेतली जाईल, तसेच इच्छुक विद्यार्थी परफेक्ट अकॅडमीच्या ओरोस येथील केंद्रावर येऊन देखील ही परीक्षा लिहू शकतात. सदर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 7448206529 / 9604317561 / 93250 17458 / 7498685329 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ॲकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.