मडुरा:महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ द्वारा आयोजित गणित प्रज्ञा परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा ता. सावंतवाडी मधील इयत्ता पाचवीतील कुमारी स्वरा संदीप निऊंगरे ही सिल्वर कॅटेगरी मध्ये उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरील गोल्ड कॅटेगरी व सिल्वर कॅटेगरीतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या यादीत सावंतवाडी तालुक्यातील 13 विद्यार्थ्यांचा समावेश असून मडुरा हायस्कूलची एक विद्यार्थिनी आहे.
पंचक्रोशीतील सुजान नागरिक, सरपंच, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरस्कर, सचिव श्रीम. कल्पनाताई तोरसकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती व समन्वय समिती सदस्य, मुख्याध्यापक श्री. सुहास वराडकर , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून कुमारी स्वराचे कौतुक व अभिनंदन होत आहे.





