देवगड : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त देवगड जामसंडे शहर भाजयुमो मार्फत जामसंडे साई दिर्बा मोटर ड्रायव्हिंग स्कूल येथे आयोजित केलेल्या मोफत टू व्हीलर लायसन्स कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन पोलादे अभिजित शिरगावकर चैतन्य बकरे प्रवीण सातारे, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
लायसन्स साठी 108 जणांनी अर्ज केले. 78 जणांची लायसन्स प्रक्रिया पूर्ण झाली
कॅम्प यशस्वी करण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक महेश भडसाळे मृणाली भडसाळे तौकीक शेख यांचे विशेष सहाय्य लाभले.





