जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बांदा पोलीस स्टेशनचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..!

39

बांदा : २६ जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने तरुण पिढी तसेच विद्यार्थी यांना अंमली पदार्थ सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत बांदा पोलीस स्टेशनं व दिशा फाउंडेशन स यांच्या वतीने राजा शिवाजी विद्यालय विलवडे प्रशालेत कार्यशाळा घेवुन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,सरपंच प्रकाश दळवी,जिल्हा व्यसनमुक्ती समन्वयक अर्पिता मुंबरकर,दिशा फाऊंडेशनचा अध्यक्ष मंगल कामत,पोलीस कर्मचारी तात्या कोळेकर,सिद्धार्थ माळकर,सहाय्यक मुख्याध्यापक जाधव आदी उपस्थित होते.

श्री.काळे यांनी मार्गदर्शन करताना,मुलांनी व्यसनापासून दूर राहावे.आपले घर व समाज सुदृढ बनवावा शेवटी काळे यांनी उपस्थितांना व्यसन मुक्तीची शपथ दिली.तर अर्पिता मुंबारकर यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसान करूच नये असे सांगितले.मंगल कामत यांनी मार्गदर्शन करताना तरुण ही देशाची संपत्ती आहे.देशाला सशक्त बनवण्यासाठी तरुण निर्व्यसनी राहून भारत देश सशक्त बनविण्यास मदत करुया असे आवाहन केले.