देवगड प्रतिनिधी : जामसंडे मळई येथील जय बजरंग स्पोर्ट क्लबच्या वतीने मळई हनुमान मंदिर येथील दहावी बारावी मधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांना जय बजरंग स्पोर्ट क्लबतर्फे वह्यासंच व पेन आदी शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट देत सत्कार करण्यात आला.यावेळी महापुरुषांचे विचार आत्मसात करून अशीच यशस्वी झेप यापुढेही घ्यावी.अशा शब्दांत मंडळाचे अध्यक्ष संजय कोळंबकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाचे अध्यक्ष संजय कोळंबकर, उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, पोलीस पाटील प्रदीप कोयंडे, मोहन कोयंडे,सूरज कोयंडे, पंढरीनाथ कोयंडे, दीपक सारंग सुरेश पांडे, नंदकुमार वाडेकर ,महेश मेस्त्री, रुपेश मणचेकर आदी उपस्थित होते .





