मालवण : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युवतीसेना सिंधुदुर्ग विस्तारक रुची राऊत व मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवणातील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळा, प्रागतिक हायस्कूल, दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल देवबाग आदी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुक्रवारी वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, भाई कासवकर, युवतीसेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, चंदू खोबरेकर, करण खडपे, अक्षय भोसले यासह अन्य पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.





