उबाठा सेनेच्या वतीने देवगड ग्रामीण रुग्णांना फळे वाटप..!

115

देवगड : महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवाभावी उपक्रम देवगड शहरामध्ये मोठ्या दिमाखास साजरा करण्यात आला.यावेळी देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना उबाठा शिवसेनेचे वतीने फळ वाटप तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी उबाठा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फलित काझी, तालुकाप्रमुख जयेश नर,नगराध्यक्षा साक्षी प्रभू, महिला शहर प्रमुख स्वप्नाली वाल्मिकी, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी,विशाल मांजरेकर, माजी नगराध्यक्ष माजी सभापती, रवींद्र जोगल, विभाग प्रमुख रमाकांत राणे,शाखाप्रमुख बाळा कणेरकर,अतुल घाडी, योगेश गोळम,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.